आजाद समाज पार्टी अमरावती जिह्यातर्फे

वासुदेव पात्रे रिपोर्टर अमरावती महाराष्ट्र ! परभणी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील उभारण्यात आलेल्या संविधान प्रतिकृतीच्या अवमान करणाऱ्या समाजकंटक नराधम, कठोर शिक्षा व्हावी या साठी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे गुरुवार दिनांक 12/12/2024 ला दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले .
ह्या वेळेस आजाद समाज पार्टी अमरावती जिल्हातील सर्व जबाबदार जिल्हा, विधानसभा, शहर,सेक्टर पदाधिकारी व पार्टीचे निष्ठावान व समर्पित कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदन आझाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनीष भाऊ साठे यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र प्रदेश पर्वक्ता प्रमोद भाऊ मेश्राम, प्रदेश मीडिया प्रभारी डॉक्टर बशीर खान पटेल, जिल्हाध्यक्ष सनी भाऊ चव्हाण, लक्ष्मण चाफलकर, रवी हजारे , अशोक इंगोले, विनीत डोंगरे ,नंदकिशोर काळमेघ ,अतुल गायगोले, अजहर पटेल, रवी बागडे, हंसराज मेश्राम जंजीर सिंग टांक व ,मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले.
विनित
सानी चौहान
अमरावती जिल्हा अध्यक्ष
आजाद समाज पार्टी